बारामती सहकारी बँकेला पारनेर न्यायालयाचा दणका

Cityline Media
0
जमिनीच्या लिलावाला स्थगिती

पारनेर प्नतिनिधी तालुक्यातील जवळे येथील योगेश सालके या जामीनदाराच्या पाच एकर बागायती शेतजमिनीच्या  लिलावास पारनेर न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती मुबीन शेख यांनी तात्पुरती स्थिगिती  दिल्याचा आदेश काढला आहे.
सविस्तर वृ असे की,पारनेर तालुक्यातील जवळे येथील योगेश सालके हा शेतकरी समर्थ इंटरप्राईजेस या कंपनीने बारामती सहकारी बँकेकडून घेतलेल्या दोन कोटी रुपयांच्या कर्जाला जामीनदार होता.या कंपनीने दहा वर्षांपूर्वी काही  कर्ज उचलले होते ते पुर्णतःथकीत असताना,बॅकेने याच कंपनीला पुन्हा चार कोटी रुपये मंजुर करून योगेश सालके यांना या कर्जासाठी जामीनदार घेतले होते.

कंपनीने घेतलेले नवीन कर्ज जुन्या कर्जात  परस्पर वर्ग करून  दिलेले नवीन कर्ज अवघ्या चार - पाच महिन्यांत थकबाकीत काढले आणि जामीदाराच्या बनावट सह्या करून वसुली दाखला मिळवला.पुढे,जिल्हा उप - निबंधक अहिल्यानगर यांचे कार्यालयाकडून तातडीने या शेत जमिनिचे विक्रीचे किमान विक्री मुल्य ठरवून घेतले व जमीन विक्रीस परवानगी  मिळवली,त्यानंतर लगेच जामीनदार सालके यांची पाच एकर बागायती शेतजमीन जाहिर लिलावाने विक्रीस काढली.

या बेकायदा होत असलेल्या लिलाव प्रक्रीयेबाबत शेतकऱ्याने पारनेर न्यायालयात दाद मागितली.आधीचे दिलेले असुरक्षित कर्ज दिर्घकाळ थकीत असताना सदरचे जुने कर्ज वसुली करीता बॅकेने अर्जदार शेतकऱ्याच्या पाच एकर बागायती शेतजमीनीचा लिलाव काढल्याची बाब न्यायालयाच्या  निर्दशनास आली.

मुळ कर्जदारांच्या  कोणत्याही मालमत्तांचा लिलाव न करता थेट जामीनदाराची  मालमत्ता लिलावास काढल्याची बाबही न्यायालयाच्या सुनावणी कामकाजा वेळी समोर आली.अशा प्रकारची बेकायदा  लिलावाची प्रक्रीया न थांबविल्यास जामीनदार शेतकऱ्याचे कधीही भरून येणारे नुकसान होवू शकते,

व अशी बेकायदा लिलाव प्रक्रिया पुढे गेल्यास अधिक गुंतागुंत निर्माण होवू शकते अशा निष्कर्ष  पारनेर न्यायालयाने काढुन लिलाव  प्रक्रीया पुढे न जाता, पुढील आदेशापर्यंत जैसे - थे - परिस्थिती  ठेवण्याचे आदेश दिले.या प्रकरणाची सुनावणी पारनेर प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती मुबीन शेख यांच्या समोर झाली.जामीनदार शेतकऱ्याची बाजु अँड. रामदास घावटे,अँड. उन्मेश चौधरी,अँड. सोमनाथ गोपाळे यांनी मांडली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!