रात्री शतपावली करणाऱ्या शिक्षिकेचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकले

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड रात्रीच्या वेळी शतपावली करणाऱ्याच शिक्षिकेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकली वरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना अशोका मार्ग येथे घडली.घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जया सागर सलुजा (रा. सिद्धिविनायक पार्क, अशोका मार्ग, नाशिक) या शिक्षिका असून, त्या काल (दि. ६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या सोसायटीजवळच शतपावली करीत होत्या.

त्यावेळी समोरून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने सलुजा यांच्या गळ्यातील १ लाख १४ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून चोरून नेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक बेग करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!