फॉलोअप,लाँग सुदर्शन क्रिया, त्र्यंबक होम,सत्संग व महाप्रसादाचे आयोजन
सोनगाव प्नतिनिधी श्री. श्री. रवी शंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या ४५ वर्षपूर्तीनिमित्त बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी श्रीरामपूर येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये साधकांसाठी विशेष फॉलोअप,गुरुपूजा, त्र्यंबक होम,सत्संग आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे करण्यात आले आहे.
सकाळी ६.३० वाजता नेवासा रोडवरील हॉटेल गुरुव्हेज येथे साधकांसाठी फॉलोअप सत्र आयोजित करण्यात आले आहे.यावेळी गुरुदेवांच्या आवाजातील लाँग सुदर्शन क्रिया होणार असून साधनेनंतर साधकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यानंतर सकाळी १० वाजता स्वामी कल्यानाणंद यांच्या उपस्थितीत गुरुपूजा, त्र्यंबक होम (महा मृत्यूंजय मंत्रजप),सत्संग व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रमही हॉटेल गुरूव्हेज येथेच पार पडणार असून आध्यात्मिक वातावरणात भक्तांना साधना व मंत्रजपाचा लाभ घेता येणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता श्रीरामपूर येथील मोरगे वस्ती, लक्ष्मी आई रोड, कुमावत चाळ परिसरात संतोष बाठीया तथापप्पू मामा यांच्या घराजवळील क्रिडांगणात भव्य सत्संग व गुरुपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळीही स्वामी कल्याणानंद यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडणार असून उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरुदेव श्री.श्री.रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमांमुळे श्रीरामपूर शहरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या दिव्य अनुभूतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
