राहुरी प्नतिनिधी तालुक्यातील तांभेरे येथील तांबे वस्ती,म्हसोबा देवस्थान जवळ असलेल्या मागील पुलाचे बांधकाम संथगतीने दीड गत वर्षापासून सुरू होते नागरिकांच्या सोयीसाठी हा पूल खुला करण्यात आला.आहे मात्र अचानक या रस्त्यावरील संरक्षण कठडा तोडून अज्ञात वाहन चालक पसार झाला आहे यामुळे येथील नागरिक संताप व्यक्त करित आहे.
या मार्गावर कोल्हार चिंचोली फाटा व अन्य ठिकाणी रहदारी ठप्प झाल्यास पर्यायी मार्गाचा वापर म्हणून या रस्त्याचा वापर केला जातो.आश्वी,शिबलापूर,संगमनेर आदी गावांना पोहोचण्यासाठी हा मार्ग जवळचा समजला जातो.म्हणून अनेक वेळा रहदारीची मोठ्या प्रमाणात वर्दळ देखील चालू असते.काही वाहन चालक बेदाकारपणे वाहन चालवून या रस्त्याचे नुकसान करताना दिसुन येतात या पुलाचा कठाडा तुटल्याने नागरिककांमध्ये नाराजी पसरली असून येथे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे असे येथील नागरिक बोलताना दिसतात.
