आश्वी प्रतिनिधी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्व भूषण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती गावातील चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोठ्या उत्साहामध्ये गावातील सर्व नागरिकांनी एकत्रित येत साजरी केली.
१३ एप्रिल रोजी रात्री बारा वाजता बुद्ध वंदना घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आतिष बाजी करत रात्री बारा वाजता जंगी स्वागत केलं तसेच दुसऱ्या दिवशी १४ एप्रिलला सकाळी गावातील आंबेडकर स्मारक येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलित करीत पूजन करत डॉ.आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी खळी गावचे सरपंच विलास गजानन वाघमारे उपसरपंच तथा संगमनेर राजहंस दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील चकोर जनसेवा नेते सुरेश नागरे शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे खळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे
अध्यक्ष सूर्यभान सानप उपाध्यक्ष हौशीराम नागरे ज्येष्ठ नेते साहेबराव मुकिंदा तांबे नंदू खरात माऊली लबडे नामदेव लबडे मा.अध्यक्ष सोन्याबापू लबडे भाऊसाहेब पाराजी वाघमारे ज्येष्ठ नेते आंबेडकर चळवळीचे रत्नाकर वाघमारे वाघमारे भाऊसाहेब सुखदेव वाघमारे नवनाथ थोरात
बाळासाहेब गवळी खळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लहानू नागरे प्राथमिक शिक्षक सुभाष चकोर दर्शन वाघमारे अशोक जमदाडे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब तांबे ॲड.बाळासाहेब वाघमारे अनिल वाघमारे आदी प्रमुख मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खळी गावातील ज्येष्ठ नेते रत्नाकर वाघमारे यांनी बुद्ध वंदना गीत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले गावातील मान्यवरांनी डॉ.आंबेडकरांच्या आठवणीला उजाळा देत डॉ. आंबेडकरांच्या संविधानावर आज आपले जीवन मंत्र अवलंबून असून आज देशासह इतर देशांमध्ये आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट असून डॉ. आंबेडकरांच्या संघर्षामुळे आज आपण सुखी जीवन जगत आहोत अशा आठवणीला उजाळा देत खळी येथे नागरिकांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले यावेळी जय भीम तरुण मंडळाचे युवक पदाधिकारी दत्तात्रय मधुकर वाघमारे,
प्रदीप भानुदास वाघमारे योगेश भानुदास वाघमारे चेतन नरहरी वाघमारे प्रवीण भाऊसाहेब वाघमारे संतोष दगडू वाघमारे बाबासाहेब सुखदेव वाघमारे अशोक दादा वाघमारे रमेश वाघमारे सोमनाथ भाऊसाहेब नागरे एकनाथ भाऊसाहेब नागरे अनिल मुंडे सतीश शिंदे सुरेंद्र राजेंद्र वाघमारे गोरख आनंद नागरे गणेश कारभारी वाघमारे अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंबेडकर जयंती निमित्त उपस्थित होते यावेळी खळी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक याला विद्युत रोषणाई केली गावातील चौका चौकामध्ये निळ्या झेंड्याने खळी गावाला सर्व निळे स्वरूप आले होते.
यावेळी खळी गावातील विद्यार्थ्यांना वही पेन शालेय साहित्य वाटप करत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच खळी गावातून भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संरक्षण सेवेसह इतर सेवेमध्ये भरती झालेल्या तरुणांचा भारतीय संविधानाची प्रत देत पत्रकार किशोर वाघमारे यांनी व गावच्या प्रमुख मान्यवरांनी सत्कार केला यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जय भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय मधुकर वाघमारे यांनी केले
