दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध-तहसीलदार वाघ

Cityline Media
0
विविध दिव्यांग संघटनेचे श्रीरामपूर तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर दिपक कदम संजय गांधी निराधार योजना मानधन जमा होण्यातील शासकीय तांत्रिक अडचणी,तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र धारकांचे बंद झालेले अनुदान सुरू करण्यासंदर्भात, तसेच गरजवंत दिव्यांगांना स्वतंत्र रेशन कार्ड सुविधा उपलब्ध करून देऊन अंत्योदय योजनेचा नव्याने उपलब्ध होणाऱ्या कोटा नुसार दिव्यांगाना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.या संदर्भातील आवश्यक पत्रव्यवहार  वरिष्ठ पातळीवर करून सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रशासन कटिबद्ध आहोत.असे प्रतिपादन श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी श्रीरामपूर तालुका दिव्यांग बैठकी दरम्यान  केले.
अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक संजय साळवे आणि सचिव वर्षा गायकवाड यांचे नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध समस्याचे निवेदन श्रीरामपूर तहसीलदार यांना देण्यात आले.

अनेक दिव्यांगांच्या खात्यावर अद्याप मानधन जमा झालेले नाहीत,तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र धारकांचे अनुदान मुदतीपूर्वक बंद करण्यात आले आहेत.ते त्वरित सुरू करावे, दिव्यांगाना स्वतंत्र रेशन कार्ड देऊन अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा या संदर्भातील सविस्तर विवेचन तहसीलदारांसमोर.संजय साळवे यांनी केले.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे यांना फोनद्वारे संजय साळवे यांनी चौकशी केली असता समाज कल्याण विभागाकडून संजय गांधी निराधार योजना दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

डीबीटी प्रणाली द्वारे अनुदान थेट खात्यावर जमा केले जाते.एकूण ८ लाख दिव्यांगांची डीबीटी प्रणालीला नोंद आहे.त्यापैकी फक्त ३ लाख ६० हजार दिव्यांगांच्या खात्यावर मानधन जमा झाले आहे.उर्वरित मानधन समाज कल्याण विभागाने वितरित करावे असे वरिष्ठाकडून सांगितले जाते.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे योजना हस्तांतरित झाल्यानंतर समाज कल्याण विभाग कसे मानधन वितरित करेल.असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.  अशी माहिती देविदास कोकाटे यांनी दिली.

आता अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी दोन्हीही देविदास कोकाटे साहेब. नव्याने दिव्यांग कल्याण सक्षमीकरण  विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्यात सुत्रता नसल्याकारणाने दिव्यांगांची विनाकारण हेळसांड होत आहे.

याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्त,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर विभागांमध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे तरच दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. बैठकीसाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड,संचालिका सहर्षा साळवे,आसान दिव्यांग संघटना उपप्रदेशाध्यक्ष सुनील कानडे,जिल्हाध्यक्ष विश्वास काळे,दत्तनगर शाखा उपाध्यक्ष महेंद्र दिवे,खोकरचे कादिर शेख, चांगदेव वानखेडे, कु.फरजाना पठाण,सौ.प्रमिला कानडे, मन्सूर पठाण,विजय कुऱ्हे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीरामपूर येथील अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक संजय साळवे आणि सचिव वर्षा गायकवाड यांचे नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध समस्याचे निवेदन श्रीरामपूर तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले.

अनेक दिव्यांगांच्या खात्यावर अद्याप मानधन जमा झालेले नाहीत,तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र धारकांचे अनुदान मुदतीपूर्वक बंद करण्यात आले आहेत.ते त्वरित सुरू करावे, दिव्यांगाना स्वतंत्र रेशन कार्ड देऊन अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा या संदर्भातील सविस्तर विवेचन तहसीलदारांसमोर.संजय साळवे यांनी केले.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे यांना दुरध्वनीद्वारे संजय साळवे यांनी चौकशी केली असता समाज कल्याण विभागाकडून संजय गांधी निराधार योजना दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

डीबीटी प्रणाली द्वारे अनुदान थेट खात्यावर जमा केले जाते.एकूण आठ लाख दिव्यांगांची डीबीटी प्रणालीला नोंद आहे.त्यापैकी फक्त ३ लाख ६० हजार दिव्यांगांच्या खात्यावर मानधन जमा झाले आहे.उर्वरित मानधन समाज कल्याण विभागाने वितरित करावे असे वरिष्ठाकडून सांगितले जाते.दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे योजना हस्तांतरित झाल्यानंतर समाज कल्याण विभाग कसे मानधन वितरित करेल.असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.  अशी माहिती देविदास कोकाटे यांनी दिली..

आता अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी दोन्हीही देविदास कोकाटे .नव्याने दिव्यांग कल्याण सक्षमीकरण  विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्यात सुत्रता नसल्याकारणाने दिव्यांगांची विनाकारण हेळसांड होत आहे.

याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्त,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर विभागांमध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे तरच दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील बैठकीसाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड,संचालिका सहर्षा साळवे,आसान दिव्यांग संघटना उपप्रदेशाध्यक्ष सुनील कानडे,जिल्हाध्यक्ष विश्वास काळे,दत्तनगर शाखा उपाध्यक्ष महेंद्र दिवे,खोकरचे कादिर शेख, चांगदेव वानखेडे, कु.फरजाना पठाण,सौ.प्रमिला कानडे, मन्सूर पठाण,विजय कुऱ्हे आदीची प्रमुख उपस्थिती होती
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!