सोनगाव शकुर तांबोळी राहुरी तालुक्यातील सोनगाव अनापवाडी पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री कृष्णाजी बाबा यांचा सोळावा वार्षिक महासप्ताहास १ मे ते ८ मे या दरम्यान अतिशय भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून यावेळी महाराष्ट्रातील नामांकित कथाचार्य भाऊ महाराज पाटील यांची श्रीराम चरित्र चिंतन कथेचे आयोजन केले आहे.
यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन हरिपाठ अखंड वीणा वादन असे अनेक कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले असून रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत श्रीराम चरित्र चिंतन कथा वाचन व त्यानंतर महाप्रसाद पंक्तीचे आयोजन केले जाते तसेच शुक्रवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी महंत हरी शरणगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार असल्याचे माहिती श्रीकृष्णाजी बाबा सप्ताह कमिटी व श्री कृष्णाजी बाबा तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी दिली.
