नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगर पालिकेच्या नावाखाली बनावट परवानगीची पावती देत सिडकोत वृक्षतोड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात महापालिकेचा खासगी ठेकेदार सचिन धाकतोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्यान निरीक्षक श्रीकांत किसन इरनक (वय ३२, रा. नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे शिवारातील बंदावणेनगर येथील प्रगती विहार को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बांधकाम सुरू आहे.
येथे अडथळा ठरणाऱ्या दोन झाडांची तोड करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष व संबंधित बिल्डर यांनी खासगी ठेकेदार सचिन धाकतोडे याला काम दिले होते. १९ एप्रिल २०२६ रोजी धाकतोडे याने महापालिकेकडून परवानगी मिळवून देण्याचे सांगून बिल्डर अध्यक्षांकडून ४० हजार रुपये घेतले.दरम्यान, त्यानंतर त्याच दिवशी झाडांची तोड करण्यात व पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीबाबत महापालिकेकडे तक्रार केली. उद्यान
शहरात सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोड प्रकरणात दर महिन्याला बनावट पावत्या देऊन लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे. या प्रकारात महापालिकेच्या उद्यान विभागातील काही अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या बनावट पावत्या देत वृक्षतोड होत असताना यात उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दरमहा लाखो रुपयांचे हप्ते जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी आता जोर धरत आहे.
निरीक्षक प्रशांत परब व पथकाने घटनास्थळी पंचनामा केला असता धाकतोडे याने बनावट पावती देत खोटी परवानगी दाखवून वृक्षतोड केल्याचे उघड झाले. यानंतर बिल्डरनेही महापालिकेत फसवणुकीची तक्रार केली. त्यावरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित धाकतोडे याने यापूर्वीही बनावट पावत्यांच्या आधारे अनेक ठिकाणी बेसुमार वृक्षतोड केल्याची माहिती समोर आली असून, अंबड व सातपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध चार ते पाच गुन्हे दाखल आहे.
