लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील सामाजिक आणि संघटनात्मक घडामोडींना नवी दिशा देणारी एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली.
या सर्वांच्या व पदाधिकाऱ्यांच्या एकमताने अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी गोपाळ चंद्रकांत राऊत यांची निवड करण्यात आली.
"स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण संघटना" यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाली संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने काही निर्णायक ठराव मंजूर केले,ज्यामुळे संघटनेच्या कामकाजाला आता अधिक बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीप्रसंगी ,अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस उमेश पन्हाळे राहता तालुका कार्याध्यक्ष आबा (संपत निर्मळ),राहाता तालुका अध्यक्ष रूपाली भालेराव ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे,तसेच मुख्य कार्यकारिणी सदस्य श्रीपाद बोकंद, सदस्य राजेंद्र पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.संघटनेमध्ये संघटना वाढीसाठी एक नवी ताकद मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण पंचक्रोशीतील तसेच मित्र परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी समाजासाठी आपल्या पदाचा योग्य वापर आपण करायला अशा व्यक्त केल्या त्यांचं कौतुक करत सदैव त्यांच्यासोबत आम्ही आहोत मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले यावेळी पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
प्रसंगी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार उत्तर देताना संघटनेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही दिली. समाजहितासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या निवडीमुळे आणि यशस्वी बैठकीमुळे राहता तालुक्यातील सामाजिक कार्याला आता एक चैतन्य प्राप्त झाले असून,संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता संघटनेच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
