परिस्थितीशी जाण असलेला भला माणूस सुधाकर भालेराव

Cityline Media
0
स्मृती ह्या कधीच नष्ट होत नाही तर त्या वर्तमान काळातच परावर्तित होतात त्यालाच मानतावादी धर्मात पुनर्जन्म असे म्हणतात अगदी अशाच सुधाकर तुकाराम भालेराव यांच्या स्मृती इथेच परावर्तित झाल्या असणार यात तीळमात्र शंका नाही.
दि.१७ मे २०२६ हा दिवस मनाला न पटणारा ठरला हा दिवस आमच्या भालेराव परिवारांला न विसरता येणारा दिवस आमच्या आयुष्यातील एक काळा दिवस ध्यानी - मनी नसतांनी आमच्या भालेराव परिवारातील एक आदर्श शिक्षक बंधू कालकथित  सुधाकर तुकाराम भालेराव (भाऊ) यांचे अपघाती निधन झाले.

आम्हा सर्वांना दुःखाचा असा धक्का बसला आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली उद्विग्न आणि कातर शब्दांत सांगणे कठीण होऊन गेले,परंतू काही व्यक्ती अशा असतात .त्या व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही पण त्यांचे ऋणानुबंध आणि स्मृतीगंध नेहमी दरवळत असतो.

भाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन म्हणून मी मांडलेल्या त्यांच्या जीवनप्रवास त्यांच्या कृतार्थ जीवनाचा संक्षिप्त परिचय ठरेल.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ," ते तरुण-धन्य होत ,जे समाजाच्या प्रगती आणि विकासासाठी आपले तारण्य तसेच संपूर्ण जीवन समर्पित करण्यास सदैव तत्पर असतात अशा महामानवांच्या विचारांपासून प्रेरित होऊन परिस्थितीच्या चुलीवर  गरीबीच्या सरपणांने पेटलेल्या आगीत ताऊन खुलाखुन  घडलेले त्यांचे कर्तृत्वसंपन्न  जीवन म्हणजे एक आदर्शच होय.

स्वतःच्या कुटुंबासोबतच समाज हित जपणारे कार्य करण्यामध्ये त्यांनी कधीही कसूर केली नाही म्हणून सुधाकर भाऊ याचं 'समाज कृतार्थ जगणं मला मोठ यथार्थ वाटते सुधाकर भाऊ अर्थातच भालेराव सर यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिले तर त्यांनी त्यांचे जीवन अगदी शून्यातून उभारले होते त्यांचे अगदी लहानपणीच मातृछत्र हरपले होते पण त्याची कमी वडिल तुकाराम भालेराव यांनी कधी जाणून दिली नाही.

त्यांच्या वडिलांना डिग्रस - मालुंजे पंचक्रोशीत .तुकाराम बाबा ' याचं नावानं ओळखलं जायचं पाऊस पाणी नसल्यामुळे उत्पन्नासाठी मोलमजुरी हा एकमेव पर्याय होता .आपल्या कुटुंबासांठी आणि मुलांच्या संगोपनासांठी भाऊंचे वडिल तुकाराम बाबा यांनी मालुंजे गावातील बिहाणी परिवारांच्या शेती मळ्यांत ( वाण्याच्या मळ्यांत ) मोलमजुरी करण्याच्या निर्णय घेतला.

आयुष्यभर बाबांनी वाण्याच्या मळ्यांत प्रामणिकपणे मोल मजुरी केली .वडिलांचा प्रामणिकपणा हाच गुण जसाच्या तसाच भाऊ मध्ये आला भाऊना तीन बंधू पण त्यांच्या एकमेवार जीवापाड प्रेम ,त्याच भावा  भावातील नातं हक्काचं आणि विश्वासच होत हे तिघे भाऊ म्हणजे एकाच वेलीवरची तीन फुल जे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत शेतकाम , गुरे राखणे ,मोटा हाकणे ,विहीरीची कामे करणे मैलोमैल उन्हा - तान्हात अनवाणी तापलेल्या रस्त्यावर दगड - गोट्यांतून पाऊलवाटा तुडवत ,अनंत असुविधाच्या परिस्थितीतही परिस्थितीचा बाऊ न करता त्यांनी शिक्षणांत खंड पडू दिला नाही .                                                                                          घुलेवाडी येथील स्टीफन्स हाऊस या मिशनरी शाळेच्या बोर्डिंग मध्ये राहून त्यांनी आपलं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना १९८२ मध्ये धांदरफळ खुर्द येथील रयत शिक्षणसंस्थेचे लोकमान्य विद्यालयात भाऊ शिक्षक म्हणून रूजू झाले .

शिक्षक झाल्यावर भाऊना गरीबीची जाण होती शिक्षकी पेशात असतांनाही भाऊचं राहणीमान अगदी साध होतं . त्यांना अंगावर फक्त स्वच्छ धुतलेले कपडे घालणे आवडायचे . त्याकाळी शिक्षकांना कुटंबिक गरजा भागतील एवढाचं पगार मिळायचा  म्हणून खूप काटकसर करून गरजा पूर्ण कराव्या लागतं म्हणून भाऊ नी लहानपणापासून गरीबीची चटके सहन केले असल्याने त्यांना काटकसर करण्यांची सवय लागली होती 

१ जानेवारी १९८६ रोजी  सुधाकर भाऊच्या विवाह संजिवनी यांच्याशी झाला भाऊ आणि वहिणीची जोडी म्हणजे आमच्या भालेराव परिवारांतील आदर्श जोडी सौ.संजीवनी वहिणी म्हणजे एक आदर्श गृहिणी ,आदर्श पत्नी ,आदर्श सून अशी अनेक बिरुदे आचरणाने सिद्ध करणारी आदर्श जीवनसाथी भाऊना भेटल्या आणि वहिनी भाऊच्या आयुष्यांच्या अविभाज्य भाग बनल्या.

१९८७ ला भाऊ  धांदरफळ  येथे कार्यरथ असतांनी बदलचे पत्र आले.  बदली घेतांना त्यांच्या पुढे अनेक पर्याय होते अनेक मित्र त्यांना सांगत होते शहरी भागात बदली घ्या मुलांना चांगल शिक्षण घेता येईल .पण ,सर आपल्या मतावर ठाम होते . त्यांनी संगमनेर तालुक्यांतील आसपास  गावात बदली करून घेण्यांचा निर्णय घेतला जर आपण दूर बदली घेतली तर आपल्या गावची माणसं भेटणार नाही ' नातेवाईकांचा कार्यक्रमाला येता येणार नाही .

आपली माणसं आपल्या विसरून जातील आपल्या माणसांना भेटता येईल या उद्देशाने सरांनी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावातील  रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय निवडले आणि या विद्यालयात २६ वर्ष ज्ञानदानांचे कार्य केले.
 
हे कार्य करित असतांनी भाऊना त्यांच्या पत्नीने उत्तम साथ दिली सरांचा पगार कमी असल्याने वहिनी शिलाई मशिन काम शिकून संसाराला हातभार लावला .आणि खेड्यातील जीवनाशी ही माणसं एकरूप राहिली त्यांना या विद्यालयात शिक्षक सहकारी त्याच्याचं विचारांचे भेटले .भागवत सर , खेमनर सर , तांबे सर  . भाऊनी शैक्षणिक क्षेत्रात  काम करतांनी ज्याप्रमाणे आदर्श विद्यार्थी घडवले.

त्याचं प्रमाणे त्यांनी त्यांची मुल आदर्श घडवलीसरांच्या मोठा मुलगा सचिन वैदयकिय क्षेत्रात एम.डी (मेडिसीन) शिक्षण पूर्ण करून  एक नाववंत डॉ. म्हणून नाशिक शहरात आपल्य कार्य करित असून नाशिक रोड या ठिकाणी सहारा हॉस्पिटल उभारून  आपलं कार्य  जबाबदारीने यशस्वीरित्या पूर्ण करित वडिलांनी दिलेला आदर्श संस्कारच जतन  डॉ. सचिन भालेराव आपल्या कार्यातून करत आहे .

सरांच्या दोन्ही मुलीनी वडिलांचा आदर्श जपला आहे सरांची मुलगी साधना ही संगमनेर मधील मेहर विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असून सरांचे जावई डॉ. सचिन भोसले  लोणी या ठिकाणी अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून लहान मुलगी प्रतिभा  ही फार्मसी डीग्री पूर्ण करून लोणी( ता राहाता . जि . अ . नगर ) येथे  प्रवरा संस्थेच्या फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

सरांचे  लहान बंधू बाळासाहेब भालेराव यांची मुल शंकर भालेराव व भिमराज भालेराव हे कन्ट्रकशन कंपनीत काम करत असून सरांचे लहान बंधू सुनिल तुकाराम भालेराव व भाऊसाहेब भालेराव आदर्श शेती करत आहे .अशा आदर्श परिवार असतांनी भाऊ आज या परिवारांत दिसत नाही .म्हणून मृत्यू  ही  एक अशी गोष्ट  ह्यावर  मिर्झा गालिब यांच्या ह्या ओळी खूप काही सांगून जातात .                                                                            मौत का एक दीन मुअय्यन है । नींद क्यों रात भर नहीं आती ? या ओळी ' गझल '  ऐकतांनी ठीक वाटतात .पण या ओळींचा अर्थ  समजल्यावर  कळतं मृत्यू अटळ आहे .आणि तो कधी ना कधी येणार हे निश्चित आहे   . तरी पण आपण त्या अपरिहार्य गोष्टीची काळजी किंवा भीती बाळगून रात्रभर डोळ्याला डोळा का लागत नाही.

 तथागत भगवान गौतम बुद्धच्या गाथेत सांगितल्या प्रमाणे पुप्फ मिलायती यथा इंद मे ,कायो तथा याति विनासंभाव ज्या प्रमाणे पुष्प हे काही काळानंतर कोमेजून जाणार आहे .त्याप्रमाणे आपले शरीरही विनाश पावणार आहे ,परंतू अचानक अपघाती जाणं व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी अतीव वेदनादायी असतं माझ्या शब्दसुमनाने कालकथित सुधाकर भालेराव सरांना भावपूर्ण आदरांजली अपर्ण करतो । साधू । साधू । साधू ।         
शब्दांकनं - भालेराव रविंद्र सुखदेव संगमनेर ७८८७४१३१७८
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!