लोणी रुपाली भालेराव मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अनोख्या दिग्दर्शन आणि अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे हे त्यांच्या आगामी बहुप्रतिक्षित 'देऊळ बंद २: आता परीक्षा देवाची' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या थेट राहाता तालुक्यातील लोणी येथील नाथगंगा चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
या विशेष दौऱ्याचे आयोजन १३ जून २०२६ रोजी रात्री बारा वाजता वाजता करण्यात आले असून,प्रविण तरडे यांच्यासह चित्रपटाचे संपूर्ण पथक प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी खास लोणी येथील नाथगंगा चित्रपटगृह रसिकांचा उत्साह वाढविण्यासाठी आले होते.आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक अभूतपूर्व सुवर्णसंधी प्रेक्षकांसाठी दिली होती.
हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून,यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवन प्रसंगात येणाऱ्या विविध अडचणी आणि संकटांवर अतिशय स्पष्ट व सविस्तरपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न अत्यंत स्पष्ट स्वरूपात आणि संवाद व प्रसंगानुरूप मांडण्यात आले आहेत.
विशेषतः शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा, बाजारातील पिकांना मिळणारा भाव आणि सावकारांचा पाश यांसारख्या गंभीर विषयांना कथानकात अत्यंत गांभीर्याने हाताळण्यात आले आहे. या सर्व कठीण प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि या संकटांतून मार्ग काढण्यासाठी 'स्वामींनी' देखील यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत भेट शेतकऱ्यांमध्ये राहून त्यांचे जीवन कसे याची प्रचिती देखील दिसून येते.
शेतकरी हा देशाचा कणा आणि बळीराजा असून, त्याला समृद्ध व संपन्न करण्यासाठी स्वामी अत्यंत श्रद्धावान आणि आश्वासक मार्गदर्शन करताना या चित्रपटात दिसून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विविध कृषी विषयासंदर्भात पुस्तके वाचूनही रासायनिक खते यांच्याबाबतीत बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे.
चुकीच्या पद्धतीने या खतांचा वापर केल्यास पूर्णपणे नुकसान ही शेतकऱ्याचेच होते आणि यातूनच शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडतो.या संकटाला तोंड देण्याऐवजी काही शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात परंतु या संकटातून मात करून पुढे जाण्याचा मार्ग स्वामिनी प्रेक्षकांना दाखवून दिलेला आहे.
चित्रपटात सामाविष्ट सर्वच कलाकारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय निर्भिड आणि प्रासंगिक स्वरूप प्रेक्षकांपुढे मांडण्यात आलेले दिसून येते.
या विशेष दौऱ्यादरम्यान उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना केवळ कलाकारांना भेटण्याचीच संधी मिळणार नाही,तर त्यांच्यासोबत अविस्मरणीय फोटो आणि सेल्फी काढण्याचा आनंदही प्रेक्षकांनी घेतला 'देऊळ बंद' चित्रपटाच्या पहिल्या भागाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
त्यामुळे या दुसऱ्या भागाबद्दल आणि कलाकारांच्या या थेट दौऱ्याबद्दल सिनेप्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी चित्रपटाचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मराठी चित्रपट संस्कृतीला बळकट प्रोत्साहन देण्यासाठी या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे.
या खास भेटीचे आणि चित्रपटाचे औचित्य साधून प्रेक्षकांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण दिवसाच्या सर्व शोचे तिकीट अवघ्या १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सर्वसामान्य प्रेक्षकांना, शेतकऱ्यांना आणि संपूर्ण कुटुंबाला मराठी चित्रपटाचा हा भव्य उत्सव अगदी कमी खर्चात अनुभवता यावा, यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे. 'चला तर मग, कलाकारांना भेटूया आणि मराठी चित्रपटाचा उत्सव साजरा करूया' असे आवाहन करत आयोजकांनी जास्तीत जास्त चित्रपटप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या लाडक्या कलाकारांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.
