६ जुलै रोजी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा
श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटना तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ वाल्मिकी समाज बुरुड समाज ख्रिश्चन समाज यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह स्थापन झालेल्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली.
प्रसंगी मा.आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर रिपब्लिकन सेनेचे चरण त्रिभुवन जय भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे पीपल्स पार्टीचे संतोष मोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजक भीमराज बागुल यांनी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती स्थापन करण्याची घोषणा केली त्याला सर्वानुमते टाळ्याच्या गजरात मान्यता देण्यात आली त्यावेळी आरक्षण उपवर्गीकरण हटाव आरक्षण बचाव अनुसूचित जातीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.
बदर समितीचा अहवाल जाहीर झाला पाहिजे या मागणीसाठी सोमवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ११ वा.प्रांत कार्यालय श्रीरामपूर येथे सर्वानुमते विराट मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले.त्यावेळी त्यावेळी भाजपाचे मिलिंदकुमार साळवे सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे.
शंभूक वस्तिगृहाचे अशोक दिवे रिपाईचे तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट रवी अण्णा गायकवाड अण्णासाहेब मोहन यांनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी विद्रोही चळवळीचे अशोक दिवे रितेश एडके ख्रिस्ती परिषदेच्या जिल्हाध्यक्ष दीपक कदम समता दलाचे दादासाहेब बनकर
रिपाईचे राजू गायकवाड सुरेश जगताप योगेश बनसोडे विशाल सुरडकर अशोक बागुल संजय रूपटक्के उत्तम मोहन राजू मगर मनोज काळे प्रदीप कदम आबासाहेब रणनवरे किरण साळवे सोमनाथ रूपटक्के शिवाजी उबाळे साहिल मोहन भानुदास सुभाष पठारे.
संजय जगताप रमेश बिंगले अण्णासाहेब जगताप प्रदीप गायकवाड सुगंधराव इंगळे निलेश हुसळे समाधान नरवडे निलेश रोहित बागुल दुशिंग दर्शन बारसे लखन पवार दिलीप रॉकी लोंढे प्रवीण साळवे आकाश त्रिभुवन किशोर ठोकळ सुनील मगर मच्छिंद्र ढोकणे आधी उपस्थित होते
सुभाष त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन यांनी केले आभार अंतोन शेळके यांनी मानले.
