झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील प्रतापुर येथील शेतकरी संजय बिडवे यांच्या शेतात पाणी पाईपलाईन मध्ये मोठ्या आकाराचा नाग निदर्शनास आल्याने येथील शेतकऱ्यांची काहीशी धांदल उडाली.
शेताच्या पाईप लाईन मध्ये नाग असल्याचे निदर्शनात आल्यानंतर येथील शेतकरी संजय बिडवे यांनी सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांना लगेच घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी संजय बिडवे यांच्या शेतामध्ये जाऊन मोठ्या आकाराचा नाग व्यवस्थित रितीने हाताळून त्याला कैद केली तो नाग जंगलात सोडून दिला .
या घटनेमुळे कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला तर सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांची परिसरांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे.
