नाशिक दिनकर गायकवाड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नाशिक आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संयुक्त विद्यमाने दिशा ट्रस्टचे नर्सिंग कॉलेज ऑफ दिंडोरी येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम यावर कायदेविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नाशिक देविदास नांदगावकर तसेच समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिज्ञा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे प्रचारक दिपक देठे यांनी जादूटोणा,भूत भानामती,नरबळी तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धा यासारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
