लघुउद्योग महामंडळ,ईपीसीची संभाजीनगरात उलट खरेदीदार विक्रेता भेट उत्साहात

Cityline Media
0
तीस कोटींपेक्षा अधिक किमतीच्या २० व्यावसायिक करारांवर स्वाक्षऱ्या

संगमनेर मच्छिंद्र पवार छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच केंद्र शासनाच्या जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स योजनेची महाराष्ट्रातील राज्यस्तरीय नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ  आणि ईईपीसी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पाचवा वा आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट अर्थात उलट खरेदीदार विक्रेता भेट कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमातून ३० कोटींपेक्षा रुपये अधिक किमतीचे २० व्यावसायिक करार  करण्यात आले असून महाराष्ट्रातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

दि.१६ व १७ जूनला छत्रपती संभाजीनगर येथील वेलकमहॉटेल बाय आयटीसी रामा इंटरनॅशनल येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात १५ देशांतील २७ आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी सहभाग नोंदविला यामध्ये अमेरिका,इंडोनेशिया, श्रीलंका,संयुक्त अरब अमिराती,फ्रान्स, केनिया,युगांडा,ब्राझील, कतार,अझरबैजान,इथिओपिया,कॅमेरून,झिम्बाब्वे आणि ओमान या देशांचा समावेश होता.

या उपक्रमात महाराष्ट्रातील २२० हून अधिक अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रम दरम्यान ७०० हून अधिक बी-टू-बी व्यावसायिक बैठका पार पडल्या.प्रत्येक उद्योगाला किमान तीन परदेशी खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन  विकास पानसरे (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रितेश चॅटर्जी, चॅप्टर कन्व्हेनर, ईईपीसी इंडिया विश्वजीत चिमणकर, उपसंचालक,डीजीएफटी तसेच पी. नाडिगर, प्रादेशिक संचालक,ईईपीसी इंडिया उपस्थित होते.

कार्यक्रम दरम्यान आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी उत्पादन दालनाला भेट देऊन महाराष्ट्रातील उद्योगांच्या उत्पादन क्षमता,गुणवत्ता व तांत्रिक कौशल्याची माहिती घेतली.तसेच विविध देशांतील खरेदीदारांनी त्यांच्या खरेदीविषयक गरजा, जागतिक बाजारपेठेतील संधी आणि महाराष्ट्रातील उद्योगांकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या.

उद्योगांना निर्यात प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी डीजीएफटी,एक्झिम बँक, विमा संस्था आणि लॉजिस्टिक सेवा प्रदाते यांच्या सहाय्य कक्षांची स्थापना करण्यात आली होती.याशिवाय महाराष्ट्रातील विविध एमएसएमई उत्पादने, पैठणी साड्या तसेच पारंपरिक कलावस्तूंचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

विदेशी पाहुण्यांसाठी महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला.
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून राज्यातील एमएसएमईंच्या निर्यात वृद्धीस चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या उपक्रमाचा लाभ राज्यातील उद्योगांना दीर्घकालीन स्वरूपात होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.दरम्यान,पुढील रिव्हर्स बायर-सेलर मीट दि. २ व ३ जुलै २०२६ नागपूर येथे फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स  यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर कोल्हापूर आणि पुणे येथेही अशा बैठकींचे आयोजन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!