राजकारणातला धुरंधर डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Cityline Media
0
प्रवरा म्हटलं की डोळ्यासमोर एकच चित्र तरळते ते म्हणजे विखे पाटील.यांचे विखे पाटील घराण्याचा जाज्वल्य वारसा चालवण्याचं काम करत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील.शिक्षण,सहकार, समाजकारण व राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात विखे परिवाराचा सिंहाचा वाटा आहे.
पुण्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवरा परिसराचे अर्ध्वायू म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील.याच अर्ध्वायूंचा आज ६७ वा वाढदिवस...!

महाराष्ट्राच्या राजकारणात विखे पाटील हे नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत.युती सरकारच्या काळात गृहनिर्माण विभागापासून सुरू झालेला हा प्रवास मध्ये महसूल व आता जलसंपदा विभागापर्यंत पोहचला आहे हि गोष्ट व वाटण्याजोगी आहे. प्रत्येक विभागात काम करताना विखे पाटलांनी आपल्या कामाचा अविट ठसा उमटवला आहे.

प्रत्येक विभागात जनसामान्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारे क्रांतिकारी निर्णय विखे पाटलांनी घेतलेले आहेत. शिक्षण मंत्री असताना इटिकेटी सारखा निर्णय असेल किंवा विधी व न्याय मंत्री असताना स्वतंत्र लवादांचे निर्माण असेल असे अनेक निर्णय विखे पाटलांनी आपल्या कार्यकाळात घेतले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली नद्या जोड संकल्पना दिवंगत खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी चर्चेत आणली. पाणी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नद्या जोड प्रकल्पाला हवा देण्याचं काम बाळासाहेब विखेंनी केलं. परंतु त्यांच्या हयातीत समितीचे गठण सोडून पुढे काही झालं नाही.

आज जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून काम करत असताना पुन्हा नद्या जोड प्रकल्प वास्तवात उतरवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे सरसावले आहेत. नदी जोड प्रकल्पासोबत हर घर जल,जल जीवन मिशन,गोदावरी खोऱ्याचे वाहून जाणारे पाणी वळविणे आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्यांच्या माध्यमातून होत आहे.

लोकसहभागाला व्यवस्थित हाताळून येणाऱ्या अडचणींना बाजूला सारण्यात त्याचा हातखंडा आहे.आपल्या महसूल मंत्रिपदाच्या काळात वाळू धोरण, तलाठी भरती तसेच सामान्यांच्या वर्ग२ च्या जमिनी वर्ग १ करणे असे अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

प्रशासनाची मजबूत पकड यामुळे हे सर्व शक्य झाले आहे.जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील म्हणजेच ' अंतिम शब्द ' अशी परिस्थिती झाली आहे. संपूर्ण राज्याचा मोठा व्याप असतानाही आपला जिल्हा आणि मतदारसंघ यांमध्ये योग्य संतुलन राखण्याचा ते प्रयत्न करतात.अर्थात त्यांच्या पत्नी,स्नुषा व मुलगा माजी खासदार डॉ.सुजय विखे यांचे योगदान आहेच परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या माणसांसाठी आपणच उपलब्ध रहावे, हे त्यांना महत्त्वाचे वाटते.म्हणूनच जनता दरबारासारखे उपक्रम राबवून लोकांच्या अडचणींना ते जाणून घेतात व लगोलग सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

आज वयाच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करत असताना तेवढीच ऊर्जा,संयम, आणि चिकाटी त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवते. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अत्यंत अभ्यासपूर्ण वर्तन तथा निर्णय हे विखे पाटलांनी घेतल्याचे आपण पाहिले आहे

अलीकडच्या मनोज जरांगे पाटलांच्या उन्हातल्या आंदोलनाला अवघ्या काही तासात संपविण्यात विखे पाटील यांना यश आले. आरक्षणासारख्या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाला हाताळताना आपल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा कस त्यांनी लावला असावा असे वाटते.

आताच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अत्यंत चाणक्य नीतीने त्यांनी जागा काढली.पोट निवडणुकीत अक्षय कर्डिलेंसमोर उभं राहिलेलं तनपुरेंच आव्हान शमवण्याची किमया विखे पाटलांनी केली आणि अक्षय कर्डिलींना मोठा मताधिक्याने निवडून आणले.

आव्हान निर्माण करणाऱ्यांनाच आपल्या पक्षात घेऊन वर आमदार करून आपली राजकीय कर्तबगारी त्यांनी सिद्ध केलीच पण त्यासोबत संपूर्ण जिल्ह्याला हादरे देण्याचं काम विखे पाटलांनी केलं.याआधीही संगमनेरच्या चाळीस वर्षांची सत्ता उलथवून संपूर्ण महाराष्ट्राला न सावरता येणारा धक्का देण्याचं काम विखे पिता पुत्रांनी केलं.

अत्यंत संयमाने,शांततेने व हसत मुखाने मोठमोठ्या शस्त्रक्रिया विखे पाटलांनी केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात कुठंही भाजप नसताना अवघ्या आठ- दहा वर्षात संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचं काम विखे पाटलांनी केलं आणि म्हणूनच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाच्या मनातही विखे परिवाराबद्दल वेगळा आदर दिसून येतो.

समाजकारणाचा, राजकारणाचा समृद्ध वारसा चालवताना चांगल्याशी चांगले व वाईटशी वाईट अशी वर्तणूक त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी समृद्ध करते.जनता दरबार किंवा इतरही रोज येणाऱ्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करून विहित काळात कामे मार्गी लावल्याने जनमाणसात त्यांची प्रतिमा उंचावली आहे.

 दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी जपलेली माणसं आणखी घट्ट कशी होतील याकडे नामदार विखेंचा कल असतो. नावावरूनच माणसं ओळखण्याची त्यांची सवय सामान्यांना आपलेसे करणारी आहे.

शिर्डी मतदार संघ परिणामी जिल्ह्याचा होत असलेला विकास , जिल्ह्यात येत असलेल्या औद्योगिक वसाहती तसेच निबे समूहासारखा आलेला मोठा उद्योग आणि निर्माण होत असलेली रोजगार क्षमता ही विखे पाटलांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीचे फलीत आहे.

जनतेच्या सुख - दुःखात धाऊन जाणारा हा नेता खरा ' कामाचा माणूस ' म्हणावा लागेल. त्यांच्याप्रती जनतेत असलेला विश्वास आणि जनतेप्रती ते सांभाळत असलेलं 'पालकत्व 'हे अतूट नाते पिढ्यान् पिढ्या टिकणारे आहे. म्हणूनच इतरांसाठी असलेले ' साहेब ' मतदार संघातल्या लोकांचेही ' आबा ' झालेत आणि राजकारणातले " धुरंधर..."
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!