श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहराबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात जर बेकायदेशीर रित्या क्लासेस चालवली जात असेल आणि विद्यार्थ्याकडून अवाजवी फी घेतली जात असेल तर त्या कोचिंग क्लासेसवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी रिपाईच्या निवेदनावर दिले.
श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी आकारणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना नुकतेच निवेदन दिले.
प्रसंगी डॉ. पंकज आशिया यांनी त्रिभुवन यांना वरील आश्वासन दिलेयावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याशी चर्चा करताना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की अनेक विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेकरिता जोरदार तयारी केली होती.
परंतु तो पेपर फुटला त्यामुळे पाच सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या नीट पेपर परीक्षेच्या घोटाळ्याचे धागेदोरे अनेक जिल्ह्यापर्यंत नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत त्यामध्ये अजून तरी अहिल्यानगर तसेच श्रीरामपूरचे नाव नसले तरीही काही खाजगी क्लास चर्चेत आहेत.
जिल्ह्यात श्रीरामपूर मध्ये पहिलीपासून पदवीधर शिक्षणापर्यंत खाजगी कोचिंग क्लासचे अक्षरशःपेव फुटले असून लातूर प्रमाणेच श्रीरामपूर पॅटर्नच्या नावाखाली पेंटागॉन कॅल्क्युलस चुडीवाल बंसल धुमाळ गाडेकर
भंडारी एस तसेच श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक क्लास चालक पालकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने देतात मात्र या क्षेत्रावर कुणाचेही प्रभावी नियंत्रण नसल्याचे खाजगी क्लास चालक आपली मनमानी करतात काही ठिकाणी तर विद्यार्थिनींना पहाटे पाच वाजताच क्लासला बोलवले जाते असे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे या क्लासेसची कुठलीही नोंद नाही तर श्रीरामपूर नगरपरिषदेकडे अपुरी माहिती मिळते क्लास चालकांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रजिस्ट्रेशन करून त्या आधारे विद्यार्थ्यांना लुटण्याचे प्रकार खुलेआम चालू आहे.
इयत्ता १ ते ५ वी पर्यंत ५ ते १० हजार रुपये ५ ते १० पर्यंत १५ ते ३० हजार रुपये तसेच केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी मॅथेमॅटिक्स या विषयासाठी १ लाख ते १५०००० लाखापर्यंत फी आकारली जाते त्याच्यावरती सरकारने कुठलेही निर्बंध नियम लावलेले नाही त्यामुळे खाजगी क्लास वाले आपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची फसवणूक करतात.
जिल्ह्यातील सर्व क्लासची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने खाजगी क्लास वाल्यांची झाडाझडती घेण्यात यावी अशीही मागणी रिपाईच्या वतीने त्रिभुवन यांनी केली आहे तसेच नीट पेपर फुटीच्या प्रकरणात खाजगी क्लास चालकांचा सहभाग आढळून आल्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनीही खाजगी क्लासेसवर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
खाजगी क्लास वाले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा निकालाच्या टक्केवारीचा गाजावाजा करत पालकांना आकर्षित केले जाते प्रवेश घेतल्यानंतर अवाजवी फी आकारले जाते मात्र सुविधा अपुऱ्याच राहतात बऱ्याच क्लासमध्ये एका वर्गामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवले जाते.
शिक्षकांची पात्रता नसता नाही त्यांना नियुक्ती दिली जाते अभ्यासक्रमांची पारदर्शकता याबाबतही स्पष्टता नसल्याच्या तक्रारी आहेत विशेष म्हणजे विद्यार्थिनिहाय आकारले जाणारी वार्षिक फी प्रचंड वाढले असून पालक आर्थिक दृष्ट्या अडचणी सापडत आहेत त्याची श्रीरामपूर शहरातील उलाढालंच कोट्यावधी रुपयात असल्याचे जग जाहीर आहे.
दरम्यान फायर सेफ्टी इमारत सुरक्षा मुला मुलींचे वेगळे स्वच्छता गृह यासारखे नियम धाब्यावर बसवले आहे तसेच काही खाजगी क्लास होणे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात त्यासाठी त्यांना परवानगी देते हा देखील प्रश्नच आहे.
त्यानंतर हाच विद्यार्थी अकरावीत गेल्यानंतर त्याला खाजगी क्लासच्या जाळ्यात अडकवले जाते याचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण-तणाव निर्माण होणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीला आवश्यक तपासणी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे समितीमध्ये सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य आहे.
याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नियुक्त सामाजिक कार्यकर्ता बालमानस तज्ञ हा स्वीकृत सदस्य म्हणून समितीत घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत मात्र या समितीने आतापर्यंत कधीही खाजगी क्लासला अचानक भेट दिली किंवा नोटीस बजावली असे ऐकव्यात नाही.
त्यामुळे ही समिती कागदावरच आहे का असाही प्रश्न त्रिभुवन यांनी केला आहे विद्यार्थ्यांना परवडेल अशी फी घेण्यात यावी, प्रत्येक क्लास चालकांनी बाहेर ठळक अक्षरात फलक लावणे सक्तीचे करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने गंभीर नोंद घ्यावी असेही रिपाईच्या वतीने दिलेल्या निवेदनात त्रिभुवन यांनी म्हटले आहे.
