३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड
लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी येथील येथील रयत शिक्षण संस्थेच्या प.डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाने २०२५-२६ च्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत अत्यंत चमकदार कामगिरी करत पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत विद्यालयाच्या एकूण ३२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. यामध्ये इयत्ता ५ वी च्या ७ विद्यार्थ्यांनी आणि इयत्ता ८ वी च्या २५ विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले आहे.
विद्यालयाच्या या यशाचे सर्वत्र विशेष कौतुक होत असून,शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इयत्ता ५ वी च्या गटात यश सोमनाथ सिनारे याने २६० गुण मिळवून आघाडी घेतली आहे, तर श्रावणी योगेश गोर्डे (२४४ गुण) आणि दिशा हरिभाऊ ठाणगे (२४२ गुण) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
कु.सानवी पांडुरंग सदगीर, श्रेयश विठ्ठल चव्हाण, हर्षिता विनायक झावरे आणि आरव योगेश पन्हाळे या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.इयत्ता ८ वी च्या परीक्षेत सानवी अनिल धिरडे हिने २६६ गुण मिळवत जिल्ह्यामध्ये ५ वा क्रमांक पटकावला आहे.
कु.आराध्या बाळासाहेब दिघे (२५८ गुण, १२ वा क्रमांक), ईश्वरी संतोष रांधवणे (२५४ गुण, १६ वा क्रमांक), सार्थक महेश गायकवाड (२५२ गुण, १८ वा क्रमांक) आणि कृष्ण बाबासाहेब काळे (२५२ गुण, २० वा क्रमांक),आयुष सुनिल थेटे( गुण २५० जिल्ह्यात २३ वा), संस्कृती संदिप अंत्रे( गुण २४८ जिल्ह्यात २८ वी ),आनंद विजयकुमार रासकर( गुण २४८ जिल्ह्यात २९ वा), साईशा मच्छिंद्र मगर गुण २४६ जिल्ह्यात ३४वी), वेदांत रमेश भालेराव( गुण २४६ जिल्ह्यात ४१ वा यांनी जिल्ह्याच्या यादीत स्थान मिळवले. यासह अन्य विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती मिळवत यशोशिखर गाठले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.डहाळे,मा.प्राचार्य एल.सी.रक्टे मा.पर्यवेक्षिका श्रीमती कडू मा.पर्यवेक्षक श्री. भुसाळ तसेच ज्येष्ठ शिक्षक जे.के.सिनारे आणि के.एल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त झाले आहे. कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे उपप्राचार्य अमोल कडू यांनीही विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष प्रयत्न केले.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू ,मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मीना जगधने,जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे,उत्तर विभागीय अध्यक्ष रोहित पवार, विभागीय अधिकारी श्री.बोडखे ,सह-विभागीय अधिकारी श्री.तोरणे आणि श्री.नाईकवाडी ,गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब विखे जनार्दन घोगरे आणि उत्तम आहेर ,तसेच कृषीभूषण प्रभावती घोगरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक आणि सेवक वृंदाचे अभिनंदन केले आहे. "सर्वोत्कृष्ट शिक्षण, सर्वोत्तम गुणवत्ता" हा एकमेव ध्यास बाळगून विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान या निकालातून अधोरेखित झाले आहे.
