झरेकाठी प्रतिनिधी राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाज भूषण सन्मान पुरस्कार संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील पत्रकार सोमनाथ भागवत डोळे यांना नुकताच जाहीर झाला आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक ५ जुलै सकाळी अकरा वाजता अहिल्यानगर सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.
सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित केला आहे .याप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व ग्रामसेवक युनियनचे नेते एकनाथ ढाकणे,यादवराव पावसे आणि सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांच्या हस्ते सोमनाथ डोळे यांना सन्मान करण्यात येणार आहे.
