झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी येथील माजी विद्यार्थी अमन गोरक्षनाथ वाळुंज यांनी चप्पल,सँडल देण्याचे आश्वासन दिले होते नुकतेच पुर्ती करण्यात आली.
विद्यार्थ्यांना सॅंडल्स भेट देण्यात आले यावेळी अमन वाळुंज यांचे वडील गोरक्षनाथ वाळुंज,यांचा सत्कार करण्यात आला .प्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष सचिन शिंदे ,युवा कार्यकर्ते रवींद्र गाडे ,ग्रामसेवक श्री.मांढरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन राजाराम शिंदे,मा.उपाध्यक्ष विजय वाळुंज ,प्रगतशील शेतकरी एकनाथ शिंदे ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्पे व शिक्षिका श्रीमती महालकर उपस्थित होते.
