श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी समितीत उद्धव महाराज मंडलिक यांची नियुक्ती

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे श्री क्षेत्र नेवासा:संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान येथून गत वर्षापासून प्रारंभ झालेल्या ऐतिहासिक श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचा विस्तार करण्यात आला असून, ज्येष्ठ किर्तनकार व वारकरी संप्रदायातील ह .भ .प .उद्धव महाराज मंडलिक यांची पालखी सोहळा समितीवर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळांच्या हस्ते उद्धव महाराज मंडलिक यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी उद्धव महाराजांचा सन्मान करण्यात आला या नियुक्तीमुळे श्री.ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या आध्यात्मिक, संघटनात्मक आणि वारकरी परंपरेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितीने व्यक्त केली.

याप्रसंगी ह भ. प .गाथा मुती राऊत बाबा,ह .भ. प .देविदास महाराज म्हस्के,ह .भ . प . राम महाराज झिंजुर्के ,ह .भ. पभगवान महाराज जंगले शास्त्री तसेच संस्थेचे पदाधिकारी ,विश्वस्त , सोहळा समितीचे सदस्य आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मा.मंत्री अण्णासाहेब मस्के , मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे ,पाटील यांनी महाराजांचे अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!