दुचाकीस्वरांचा गोळीबार,तलवारीचे वार करत माजी सरपंचास जीवे मारण्याचा प्रयत्न

Cityline Media
0
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल;आरोपींचा पोलीसांकडून शोध सुरू

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील मांलुजे गावातील गोसावी फाटा परिसरात माजी सरपंचावर पिस्तूलातून गोळीबार करून तसेच तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
फिर्यादी संदीप भाऊसाहेब घुगे (वय ४३, रा. मांलुजे, ता. संगमनेर) हे १ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी असताना दोन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन गोंधळ घातला.

या प्रकरणातील नामनिर्देशित आरोपींमध्ये विशाल हौशिराम खेमनर (रा. अंभोरे),प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डिग्रस) तसेच सुदर्शन शिवाजी श्रीराम यांचा समावेश असून त्यांच्यासोबत आणखी तीन अनोळखी साथीदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पिस्तूलातून गोळीबार करून दहशत निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता तलवारीने घराच्या दरवाजावर आणि खिडकीवर वार करून नुकसान केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली.घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच आर्म्स 

ॲक्ट मधील विविध कलमान्वये गुन्हा क्रमांक ३७१/२०२६  कलम १०९, ३५१(२) ३५२, ३२४(६) ३२९ , ३(५) आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५ , ५/२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे,पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, हल्ल्याचे मूळ कारण वैयक्तिक वाद आहे की अन्य काही, याचा तपास सुरू आहे.
संगमनेर तालुक्यात घडलेल्या या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!