राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदार याद्यांचे सखोल ‌पुर्ननिरिक्षण-मंत्री विखे पाटील

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी केवळ निवडणुक म्हणून नाही तर, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम महत्वाची आहे.एक जबाबदार नागरीक म्हणून यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने  योगदान देण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
 अहिल्यानगर शहर मतदार संघात सुरू असलेल्या मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहीमेचा आढावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.आमदार संग्राम जगताप महापौर ज्योती गाढे,उपमहापौर धनंजय जाधव प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,काही प्रभागांमध्ये मॅपिंगचे काम चांगल्या पध्दतीने झाले आहे.परंतू काही ठिकाणी होत असलेल्या हलगर्जीपणा पाहाता यामध्ये योग्य समन्वयाची गरज त्यांनी व्यक्त केली.

एसआयआरच्या कामास मुदतवाढ मिळाल्याने उरलेल्या दिवसात अधिकचे काम करण्याची संधी आहे.बीएलओ नी खरे तर घरोघरी जाणे अपेक्षित आहे.पण ते होत नसल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी प्रातांधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.दुबार नोंदणी,मृत व्यक्तीची नावे याबाबत जागृकपणे काम होण्याच्या दृष्टीने पक्षाने नेमलेले प्रतानीधी आणी शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पश्चिम बंगालचे उदाहरण देवून मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की,एक कोटी बांगलादेशी मतदार होते. एसआयआर मोहीमेमुळे या मतदारांची दहशत संपली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सतेवर आले.देशाच्या सर्वगीण विकासाचा एक रोडमॅप आणि तयार होणारे डाॅक्युमेंट महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात परंपरेने असलेल्या मतदार याद्यावरच आजपर्यत निवडणूका झाल्या.मात्र शहरी ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर झाले तरी मतदार यादीत नाव तशीच राहीली आहेत.यासाठी जागृतपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.काही धार्मिक स्थळामधून मॅपिगचे काम होत असल्याची गंभीर तक्रार त्यांनी केली.कार्यकर्त्यानी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले.
-निपक्षपाती मतदार याद्या तयार होतील-मंत्री विखे पाटील 
मतदार मॅपिंगसह सर्व प्रक्रीया या शासकीय कार्यालयात अथवा गावातील प्रभागातील शाळांमध्ये बसून करण्याची जबाबदारी बीएलओची आहे.मात्र कुठल्या धार्मिक स्थळांतून हे काम सुरू असेल तर अतिशय गंभीर आहे. कार्यकर्त्यानी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेवून चौकशी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी प्रातांधिकारी पाटील यांना दिले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!