झरेकाठी सोमनाथ डोळे राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील साहेबराव कारभारी हारदे यांच्या गट नंबर१८९ येथील वस्तीवर बिबट्याने घरा लगत बांधलेल्या पाच शेळ्याचा फडशा पाडल्याची धक्कादाय घटना नुकतीच घडली असून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे तर शेतकऱ्यांचे तीस ते चाळीस हजार रुपयांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे.
भर दिवसा पाच वाजता सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पशुपालक साहेबराव कारभारी हारदे यांच्या घरासमोर शेळ्या बांधलेल्या असताना अचानक बिबट्याने तिथे आला काही क्षणातच त्याने शेळ्यांवर जडप घालत हल्ला चढवला.
या हल्ल्यात पाच शेळ्या मृत्यू झाल्या आहे.
कुटुंबियांनी आरडाओरड करत धाव घेतल्याने बिबट्याने तेथून जंगलाच्या दिशेने पलायन केले या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.पंचनामे नंतर अनिल हारदे .मा.सभापती भीमराज हारदे ,बाळकृष्ण हारदे अमोल हारदे ,माधव हारदे,सरपंच दादासाहेब हारदे,यांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसापासूनच तुळापूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून आता तो थेट मानव वस्तीवर येऊ लागल्याने शेतकरी महिला व लहान मुलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभीर बनला आहे पशुपालक साहेबराव हारदे यांची मोठी आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वन विभागाकडे या परिसरातून ग्रामस्थांनी केली आहे.
