शेततळ्यात बुडून आजोबा-नातवाचा मृत्यू

Cityline Media
0
सावरगाव तळ येथे हृदयद्रावक घटना;गुळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

संगमनेर सोमनाथ डोळे तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे सावरगावतळ पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवी रित्या घडलेल्या या घटनेत पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५ वर्षे) आणि त्यांचा नातू श्रवेश संतोष गुळवे (वय १३ वर्षे) यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे सावरगाव तळ परिसरात शोककळा पसरली असून,गुळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास पांडुरंग गुळवे आणि त्यांचा १३ वर्षीय नातू श्रवेश हे शेत तळ्याजवळ असताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली.दोघेही शेततळ्यात बुडाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

एकाच कुटुंबातील आजोबा आणि नातवाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेने गुळवे कुटुंबीयांवर मोठे दुःख ओढवले असून, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येत आहे.शेततळे,विहिरी आणि पाणवठ्यांच्या ठिकाणी लहान मुलांसह नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!