आश्वी पोलीस ठाणे इमारत जागेचा प्रश्न लवकरच मार्गी
झरेकाठी सोमनाथ डोळे ‘गाळमुक्त धरण आणि अतिक्रमणमुक्त कालवा’ असे धोरण जलसंपदा विभागाने घेतले असून, राज्यातील उजनी, जायकवाडी आणि मुळा धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे पाणीगळती कमी होऊन कालव्यांची पाणीवहन क्षमता वाढून सिंचनक्षेत्राला मोठा लाभ होईल,असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जलसंपदा विभागाने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील प्रवरा डावा-उजवा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
ज्येष्ठ नेते शाळिग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास निवृत्त सनदी अधिकारी शिवाजी जोंधळे,कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक बाळासाहेब शेटे,अहिल्यानगरचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे
भगवान इलग ,नारायण कहार ,गणपत शिंदे, पंचायत समिती मा.सदस्य तबाजी मुन्तोंडे ,विजय म्हसे ,ॲड पोपट वाणी ,सौ.रोहिणी निघुते, जोंधळे,मच्छिंद्र थेटे,आर,,डी कदम रिपाईचे आशिष शेळके,ॲ.अनिल भोसले,रमेश गीते,
सतिश जोशी,संदीप घुगे, ॲड रवींद्र शेळके,सचिन शिंदे,पप्पू गाडे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अभियंता प्रमोद माने, बांधकाम अभियंता काशिनाथ गुंजाळ , अमित प्रधान आश्वी संरपच नामदेव शिंदे ,जेहूर शेख,विनायक बालोटे,संजय गांधी,अजय ब्राह्मणे,सुभाष होडगर,अशोक जव्हाड, अनिल म्हसे, राजेंद्र जाधव सुनिल मुन्तोंडे ,गणेश भूसाळ
यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढवावी लागेल. यासाठी राज्यातील उजनी,जायकवाडी आणि मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे.तीन धरणांतील गाळ काढला गेला तर १५ ते २० टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांसाठी ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचेही काम आता वेगाने पूर्ण होत आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणालाही आता बोगद्याची जोड देऊन पाण्याचे वहन केले जाणार असून, पाण्याचा अपव्यय टाळणे हाच यामागचा उद्देश असल्याचे स्पष्ट करून,दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर पारंपरिक पाण्याचे स्रोत,आढे-नाले अतिक्रमणमुक्त करावे लागणार असून, यासाठी सुद्धा जलसंपदा विभागाने विशेष मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांसाठीच सर्व निर्णय घेत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची केवळ घोषणा केली नाही,तर प्रत्यक्ष तिची अंमलबजावणी झाली आहे. ४८ हजार कोटी रुपयांचे वीजबिलही माफ झाले असून, आश्वी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.जलसंपदा विभागाच्या आश्वी येथील इमारतीचे नूतनीकरणही करण्यात येणार असून, यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
