झरेकाठीत एका पाठोपाठ एक शेळ्या बिबट्याने केल्या जखमी आणि ठार

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सिद्धार्थ आबासाहेब वाणी यांच्या झरेकाठी येथील गट नंबर ११३ येथे पहाटे बिबट्याने   हल्ला केला  दोन शेळ्या ठार केल्याने येथील पशुपालक हवालदिल झाले आहेत. 
घटनेची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी संगमनेर वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग ३ दिलीप जिरे यांना देताच जिरे यांनी वनरक्षक रामेश्वर हरिभाऊ मंडपे,वनपाल सुजित मारुती बोकडे,वनसेवक उत्तम भुसारी,वनसेवक नजीर शेख सामाजिक कार्यकर्ते वरुण वाणी हे घटनास्थळी दाखल होऊन बिबट्या प्राण्यांनी हल्ला केलेल्या शेळींचा पंचनामा केला आहे यापूर्वीही दोन घटना ताज्या असताना ही घटना घडली आहे याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे .

शुक्रवारी पहाटे पाच वाजता झरेकाठी येथील संपत गेनू वाणी यांच्या राहत्या घरी गट नंबर१८२  बिबट्या प्राण्याने शेळी वर हल्ला केला शेळी जखमी झाली,तर बाजीराव वाणी यांच्याही एक शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केली आहे.

तसेच संदीप वाणी यांच्यावरही ह्याच परिसरामध्ये हल्ला झालेला आहे तरी वन विभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तसेच ड्रोन कॅमेरा फिरवून बिबट्या प्राणी हा जेरबंद करावा व शेतकऱ्यांची झालेली नुकसानी भरपाई लवकर देण्यात यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी वन विभागाकडे केली आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!