विद्यार्थ्यांना खेळाचे कपडे वाटप;मनोहर बाबा विद्यालयाला संगणक संच प्रदान
सायखिंडी संदेश गायकवाड संगमनेर तालुक्यातील सायखिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि गावचे सुपुत्र प्रथितयश अभियंता संतोष गोपीनाथ शिंदे यांनी मातृसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला.
मार्गदर्शक संदेश गायकवाड यांच्या प्रेरणेतून अभियंता शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री सौ.रंजना गोपीनाथ शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार खेळाचे कपडे वाटप केले."शिक्षणासोबतच खेळ हे देखील व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे" हा संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला.
विशेष म्हणजे,यापूर्वीच अभियंता शिंदे यांनी मनोहर बाबा विद्यालय,सायखिंडी येथील विद्यार्थ्यांच्या संगणकीय शिक्षणासाठी अत्याधुनिक संगणक संच भेट देऊन शिक्षण क्षेत्राला मोठा हातभार लावला होता.
ध्वजारोहणानंतर झालेल्या या वाटप कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक,ज्येष्ठ नागरिक,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभि. संतोष शिंदे यांच्या या दानशूर आणि समाजाभिमुख कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या कार्यामुळे सायखिंडी गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
