दाढ खुर्द सोसायटी अध्यक्षपदी साहेबराव भांड तर उपाध्यक्ष सिताराम साळवे यांची बिनविरोध निवड

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी साहेबराव गणपत भांड तर उपाध्यक्षपदी,सिताराम तुकाराम साळवे यांची बिनविरोध निवड  करण्यात आली.
भाजपा नेते मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जनसेवा मंडळाच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रसंगी साहेबराव गणपत भांड यांची अध्यक्ष म्हणून नावाची सूचना रामलाल कोंडाजी कहार यांनी मांडली,

त्यास अनुमोदन भाऊसाहेब रभाजी जोशी यांनी दिले तर सिताराम तुकाराम साळवे यांची उपाध्यक्षपदी म्हणून सूचना मनोहर जानकु जोशी यांनी मांडली त्यास अनुमोदन श्रीमती.शोभा नामदेव वाडगे यांनी दिले.बापू भिका जोशी,श्रीमती. पारुबाई तुकाराम जोरी हे निवड प्रक्रियेत सहभागी होते.

साहेबराव भांड व सिताराम साळवे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी राजेश जोशी ,सचिव माधव हारदे यांनी जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष  यांचा सत्कार ग्रामस्थ व संस्थेच्या सभासदांच्या वतीने करण्यात आला.

प्रसंगी विखे पाटील कारखान्याचे मा.संचालक शांताराम महाराज जोरी,प्रवरा फळे भाजीपाला संस्थेचे संचालक आण्णा गेणु जोशी, दाढ खुर्द दूध संस्था अध्यक्ष नारायण कहार,सरपंच सतिश जोशी,अहिल्यादेवी पतसंस्था अध्यक्ष भास्कर जोरी,

उपाध्यक्ष ,ज्ञानेश्वर वाडगे,भास्कर वाडगे, भिमराज बुधे,आप्पा मोहन जोशी,सुरेश बिरे,बाबासाहेब वाडगे, ज्ञानदेव भांड,हौशीराम भांड,पोपट गिते, शिवाजी जोशी, बाळासाहेब जोशी,बाबुराव जोशी,धोंडीराम जोशी, प्रल्हाद कहार,राजेंद्र जोरी,योगेश जोशी,गणेश जोशी,आदीसह सेवा सोसायटीचे संचालक सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!