श्रीरामपूर रुपाली भालेराव श्रीरामपूर तालुका आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
श्रीरामपुर तालुका आशा कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून सौ. कॉ. अंबिका भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तालुका सचिव म्हणून शर्मिला शेख यांची तर उपाध्यक्ष पदी अर्चना आसने त्रिशीला शरणागते सविता भांड यांची निवड करण्यात आली आहे . खजीनदार पदी समिना शेख तर सह सचिव म्हणून कोमल माळी यांनी निवड करण्यात आली आहे .११ आशा कर्मचारी यांची कार्यकारणीत निवडण्यात आली आहे.
नुकतीच पंचायत समिती श्रीरामपुर येथील प्रांगणात आशा कर्मचारी बैठक संघटनेचे जनरल सचिव ॲड.कॉ.सुधीर टोकेकर व कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली या वेळी बहूसंख्य आशा कर्मचारी उपस्थित होत्या.
आशांना श्रीरामपुर तालुक्यात अनेक जाचक कामाची सक्ती केली जाते अशा भावना आशांनी बोलून दाखविल्या लवकरच श्रीरामपुर तालुक्यात आशांच्या प्रश्नासंदर्भात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी आशांना सांगितले.
नुतन तालुका अध्यक्ष कॉ.अंबिका भालेराव यांनी सर्व आशांना बरोबर घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आयटक संघटनेच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे यावेळी सांगितले.
शेवटी कार्याध्यक्ष सुरेश पानसरे यांनी सर्वांचे आभार मानले.
