अंधश्रद्धेच्या श्रुंखला तोडत भिमयुगाकडे नेणाऱ्या अनोख्या वाढदिवसाचे आयोजन

Cityline Media
0
साकुरला विजयादशमीला डॉ. सुनील आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

सामाजिक तथ्ये ही व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात असतात ती कोणत्याही एका व्यक्तीने निर्माण केलेली नसतात;व्यक्तीच्या जन्मापूर्वीपासून ती समाजात असतात आणि त्याच्या मृत्यूनंतरही ती टिकून राहतात अशीच सामाजिक जाण असलेले संगमनेर तालुक्यातील साकूर येथील आशीर्वाद थेरेपी अँड आयुर्वेद सेंटरचे संचालक,बौद्धाचार्य सुनील पुंजाजी आव्हाड यांचा वाढदिवस विजयादशमी दिवशी २० ऑक्टोबर २०२६ रोजी साकूर येथे विविध सामाजिक उपक्रमान्वे आयोजित करण्यात आला आहे. 
ह्या वाढदिवसानिमित्ताने समाजातील शोषित वंचित उपेक्षित आणि दुर्लक्षित व्यक्तीचा यथायोग्य सन्मान करण्यात येणार आहे.या वाढदिवसाच्या पुर्वसंधेला पत्रकार सचिन सोनवणे,सफाई कर्मचारी छबु सोनवणे, रणखांब येथील सर्पमित्र विजय जाधव यांना शाल,वृक्ष संविधान देऊन पेढे भरवून स्वागत करण्यात आले.तसेच अंगणवाडीतील बालकांना पेढे भरवून भिंतीवरील घड्‌याळ भेट देण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.सुनिल आव्हाड म्हणाले की प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाप्रती आपली तळमळ व्यक्त केली पाहिजे.यावेळी वाढदिवस दिनी स्मशानभूमीतील महिला कर्मचारी चंद्रकला गायकवाड यांना साडी,वृक्ष संविधान देण्यात येऊन तिथेच स्मशानभूमीत जेवण करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भालेराव यांच्या हस्ते दरेवाडी येथे वृक्षारोपण करून तिथे कोणताही डामडौल न करता विधवा महिला संगीता मिसाळ यांचे कडून औक्षण करण्यात येणार आहे.तसेच वाढदिवस  दिवशी येणाऱ्या सर्व रुग्णांना मोफत उपचार व औषधे देण्यात येणार आहे. तसेच संस्थाचालक शिक्षक भाऊसाहेब भडांगे यांच्या शाळेत वृक्षारोपण करण्यात आहे.या प्रत्येक कार्यात डॉक्टरांच्या पत्नी थेरपी सेंटरच्या संचालिका मनीषा आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.यावेळी आंतरजातीय मंगल परिणय झालेल्या उपासक,उपासिकेचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉ.सुनील आव्हाड हे रिपाइंचे माजी सिन्नर तालुकाध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष होते सध्या ते  भारतीय बौद्ध महासभा संगमनेरचे लेखापरीक्षक म्हणून काम पाहतात.त्यांनी यापूर्वी कॅसेट 'भिम नाव गाजते' पुस्तक 'भिमबुद्ध गीते' तसेच 'सम्राट' दिनदर्शिका प्रत्येक तारखेस बाबासाहेबांचे कार्य त्यांनी जनतेसमोर मांडले.त्यांच्या कलेचा प्रवास रोड ते टीव्ही आहे.त्यामुळे त्यांना अनेक मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय 'समाजरत्न' पुरस्कार राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय 'महाराष्ट्र भूषण', पूज्य भन्तेजींचा 'आरोग्य सेवक' महू जन्मभूमी ट्रस्ट मध्य प्रदेश सचिव मोहनराव वाकोडे  यांचा 'धम्मरत्न' पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांच्या ३ बंधूंना शासनाचे वृद्ध कलावंत पेन्शन मिळते. यापूर्वी आमदार,खासदार, मंत्री यांच्यासोबत केलेले अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केले.याची नोंद अनेक वृत्तपत्रांनी घेतली आहे. समाज व अंधश्रद्धा न मानणाऱ्या कलियुगातील नास्तिक परंपरा सोडून विज्ञानवादी धम्माला अनुसरून आपले वाढदिवस व इतर कार्यक्रम करावे यातच आपले हित आहे असे डॉ.सुनिल आव्हाड यांनी स्पष्ट केले.

डॉ.सुनिल आव्हाड-
९६८९५५३१५१,९६८९०६८७२०
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!